चर्चगेट येथील महिला वसतिगृहातील १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून हत्या

या घटनेनंतर वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक गायब असून त्याचा मृतदेह रेल्वे ट्रकवर आढळून आला
चर्चगेट येथील महिला वसतिगृहातील १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून हत्या

चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तरुणीचा एका खोलीत विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक गायब असून त्याचा मृतदेह रेल्वे ट्रकवर आढळून आला आहे. त्यामुळे त्यानेच हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील चौथ्या मजल्यावरील एका खोलीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुळची अकोला येथे राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. ती विवस्त्र अवस्थेत होती.विशेष म्हणजे तिची खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाचा शोध घेतला असतो तो गायब असल्याचे आढळून आले. या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकाचा शोध घेतला असता रेल्वे ट्रकवर त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानेच या तरुणीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in