बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोघा फरार आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. दोघेही २७ वर्षांपासून फरार होते. गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपींचा कथित सहभाग लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला. मुनाफ अब्दुल मजीद हलारी आणि मोहम्मद शोएब कुरेशी अशी दोघा आरोपींची नावे आहेत.
बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका
बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका
Published on

मुंबई : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोघा फरार आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. दोघेही २७ वर्षांपासून फरार होते. गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपींचा कथित सहभाग लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला. मुनाफ अब्दुल मजीद हलारी आणि मोहम्मद शोएब कुरेशी अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

१२ मार्च १९९३ रोजी मुंबई शहर साखळी बॉम्बस्फोटाने हादरून गेली होती. त्या बॉम्बस्फोटांसाठी मदत केल्याचा आरोप मुनाफ अब्दुल मजीद हलारीवर आहे, तर मोहम्मद शोएब कुरेशी हा बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या मुख्य आरोपींपैकी एक आहे. तो दुबईत रचलेल्या कारस्थानामध्ये सामील झाला होता. त्या कटाचे नेतृत्व मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमने केले होते.

नंतर तो बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्याच्या हेतूने शस्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला गेला होता. दोन्ही आरोपींच्या जामीन अर्जाना विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी जोरदार विरोध केला. हलारीचा बॉम्बस्फोटाच्या कटात खोलवर सहभाग आहे.

logo
marathi.freepressjournal.in