कांदिवलीत बांधकामाधीन इमारतीवरून पडून २ मजूर ठार

दोन्ही मृत कामगार हे पश्चिम बंगालमधील असून बांधकाम साइटवर राहत होते
कांदिवलीत बांधकामाधीन इमारतीवरून पडून २ मजूर ठार

मुंबई : कांदिवलीत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरुन पडून दोन मजूर ठार झाले.

कांदिवलीत ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये एका २१ मजली इमारतीचे काम सुरू असताना दुपारी ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या १३ व्या मजल्यावर प्लास्टरिंगचे काम सुरू असताना इमारतीभोवती बांधलेल्या बांबूची चौकट तुटली व दोन कामगार खाली पडले. या दोन्ही कामगारांनी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व आवश्यक सुरक्षाविषयक साधने घातली होती. या दोन कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोन्ही मृत कामगार हे पश्चिम बंगालमधील असून बांधकाम साइटवर राहत होते.

logo
marathi.freepressjournal.in