'पता है क्या मै कौन हूं' : मुंबईत विरार एसी लोकलमध्ये विनातिकीट तरुणांचा गोंधळ; Video झाला व्हायरल

विनातिकीट प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना तिकीट तपासणीसांनी पकडल्यावर त्यांनी एकच गोंधळ घातला. दोघांपैकी एकाने तर 'पता है क्या मै कौन हूं' अशी धमकीही दिली.
'पता है क्या मै कौन हूं' : मुंबईत विरार एसी लोकलमध्ये विनातिकीट तरुणांचा गोंधळ; Video झाला व्हायरल

लोकलला मुंबईची जीवनवाहिनी संबोधले जाते. लोकलमध्ये घडलेल्या अनेक घटनांची चर्चा होत असते. अनेकदा अशा घटना व्हायरलही होतात. असाच एक प्रकार गुरुवारी दुपारी विरारला जाणाऱ्या वातानुकुलीत लोकलमध्ये घडला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना तिकीट तपासणीसांनी पकडल्यावर त्यांनी एकच गोंधळ घातला. अन्य प्रवाशांनी त्यांना उतरवून देण्याची मागणी केल्यावर तर दोघांपैकी एका तरुणाने 'पता है क्या मै कौन हूं' अशी धमकीही दिली. हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट तपासणीसांनी या दोन्ही तरुणांकडे तिकीट मागितले असता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रेनमधील इतर प्रवाशांसोबतही त्यांची बाचाबाची झाली. हे तरुण प्रवाशांच्या अंगावर धावून जातानाही दिसत आहेत. शिवीगाळही व्हिडिओत ऐकू येतेय. यानंतर नालासोपारा येथील रेल्वे संरक्षण दलाला(RPF) पाचारण करून दोन्ही तरुणांना त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, "वातानुकूलित लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार अचानकपणे तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमुळे एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत 46,000 हून अधिक अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करत 154.67 लाख रु. दंड वसूल करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 50 टक्क्यांनी जास्त आहे,” अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in