२० ते २५ दहशतवादी असून बॉम्ब तयार करत असल्याला फेक कॉल ; मुंबई पोलिसांत खळबळ

मुंबई पोलिसांना गेल्या काही महिन्यांपासून ८० हून खोटी माहिती देणारे किंवा धमकी देणारे फोन आले आहेत.
२० ते २५ दहशतवादी असून बॉम्ब तयार करत असल्याला फेक कॉल ; मुंबई पोलिसांत खळबळ

मुंबई पोलिसांना गेल्या काही महिन्यांपासून ८० हून खोटी माहिती देणारे किंवा धमकी देणारे फोन आले आहेत. गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा खोटा फोनकॉल ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. मुख्यमंत्र्यांशी बोलायला नाही दिले तर मंत्रालय उडवून देईन अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली होती. तसंच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा कॉल करून पोलिसांना त्रास दिला होता आणि आता बोरिवली येथील कस्तुरबा मार्ग परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत असल्याचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी ताबडतोब तपास सुरु केला आहे.

बोरिवली कस्तुरबा मार्ग येथील लेबर कॅम्प परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत आहेत आणि ते लोकं दहशतवादी असल्याची माहिती देणारा फोनकॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी सकाळी चारच्या सुमारास आला. ही माहिती गुन्हे शाखेने पोलिसांना दिल्यानंतर बांगुर नगर पोलिसांनी घटनास्थळी लगेच जाऊन एका संशयीताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यांनतर आरोपीने दारूच्या नशेत खोटा फोनकॉल केला हे कबूल केलं.

पोलिसांनी एका संशयी इसमाला ताब्यात घेतलं आहे आणि त्याने दारूच्या नशेत खोटी माहिती दिली हे समोर आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस बंदोबस्तासाठी सगळीकडे तैनात असताना या कॉलमुळे पोलीस यंत्रणांवरील ताण अधिक वाढला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in