मुंबई : नाल्यातील कचऱ्यामुळे पावसाळ्यात नाल्याशेजारील परिसरात पूरस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. नाल्यात रस्त्यावर कचरा टाकताना आढळल्यास, २०० रुपये दंड आकारण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने बजावले आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल अशा विविध वस्तू नाल्यांमध्ये किंवा गटारांमध्ये टाकू नये, असे आवाहन पालिकेकडून सातत्याने केले जाते. तरीही काही नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग अव्याहतपणे काम करत आहेत. नागरिकांनीही जबाबदारीने वागावे. भरतीच्या काळात नाल्यातून तरंगणारा कचरा आणि गाळ काढण्याच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत असतात. नाल्याच्या नजिकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी, नागरिकांनी नाल्यात थेट कोणताही कचरा न टाकता पालिकेला सहकार्य करावे. कचरा केवळ कचरा कुंडीतच टाकावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईच्या स्वच्छतेसाठी जगात नावलौकिक झाला पाहिजे, हे ध्येय ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ३ डिसेंबर २०२३ पासून ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ सुरू केली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कार्यवाही केली जात आहे.
पालिकेचा इशारा
प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल अशा विविध वस्तू नाल्यांमध्ये किंवा गटारांमध्ये टाकू नये, असे आवाहन महानगरपालिकेकडून सातत्याने केले जाते; तरीदेखील काही नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनीही जबाबदारीने वागावे. गाळ काढण्याच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळ कचरा हा कचरा कुंडीत टाका अन्यथा कारवाई असा इशारा पालिकेने दिला आहे.