Nana Patole : काँग्रेसमधून नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी

काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून यावेळी एकही काँग्रेस नेत्यांनी नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून काढण्याची मागणी केली
Nana Patole : काँग्रेसमधून नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन सुरु असताना महाराष्ट्रात मात्र काँग्रेसची स्थिती चांगली नाही. याचे कारण म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. बाळासाहेब पाटील आणि त्यांच्यामधील वाद आता कुठे थंड झाला असतानाच आता दुसरा एक वाद समोर उभा येऊन राहिला आहे. नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी घेऊन २१ नेते निरीक्षक रमेश चिन्निथा यांची भेट घेतली आहे.

काँग्रेसमधील २१ नेते नाना पटोलेंवर नाराज असून त्यांनी ही मागणी केली आहे. यामध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव खान नायडू, प्रदेश काँग्रेसचे सदस्य प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे. त्यांना पदावरून काढून काँग्रेस नेते शिवाजी मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी या नेत्यांनी रमेश चिन्निथाला यांंच्याकडे केली. यावेळी नाना पटोलेंवर बोलताना त्यांनी आरोप केले की, "नाना पटोलेंमुळे पक्षामध्ये गटबाजीला सुरुवात झाली असून त्यांचा मनमाणी कारभार सुरू आहे. काँग्रेसमध्ये नानागिरी सुरू करणार असं ते म्हणत असतात. ते कोणाचेच ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावे आणि त्यांच्या जागा आदिवासी नेते शिवाजी मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करावे," अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in