खाडीपात्रात गोबिड माशांच्या २१ प्रजातींची नोंद

अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता.
खाडीपात्रात गोबिड माशांच्या २१ प्रजातींची नोंद

महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ला महाराष्ट्रातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासादरम्यान एकूण २१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद करण्यात आली.

बीएनएचएसला महाराष्ट्रातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता.अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता.या प्रकल्पांतर्गत बीएनएचएसने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. बीएनएचएसने केलेल्या अभ्यासादरम्यान २५ स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये लहान ते मोठ्या खाड्या, मडफ्लॅट्स, कांदळवन आणि संबंधित अधिवास यांचा समावेश आहे. सर्वेक्षण केलेल्या काही प्रमुख खाड्यांमध्ये ठाणे खाडी, पनवेल, धरमतर, कुंडलिका, सावित्री, आंजर्ले, दाभोळ, जयगड, काजळी, वाघोटण आणि कराळी खाड्या आणि इतर अनेक लहानमोठ्या खाड्यांचा अभ्यास करण्यात आला आणि अभ्यासादरम्यान एकूण २१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद करण्यात आली. गोबिड माशांवर पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणावर अभ्यास केला गेला आहे आणि यामुळे आम्हाला राज्यातील प्रमुख कांदळवन आणि नदीच्या किनारी भागात या माशांची विविधता आणि अधिवास समजून घेता आली आहे, असे कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले. या नवीन अभ्यासामुळे आम्हाला महत्त्वाच्या गोबी मत्स्यक्षेत्राचे वर्णन करण्यास मदत होईल आणि कांदळवनांच्या जैवविविधतेसाठी संवर्धन उपक्रमांना प्राधान्य देण्यात मदत होणार आहे, असे बीएनएचएस मधील मत्स्यशास्त्रज्ञ आणि या प्रकल्पाचे मुख्य उन्मेष काटवटे यांनी सांगितले.

बीएनएचएसने केलेल्या अभ्यासात २५ स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासादरम्यान गोबिड माशांवर पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणावर अभ्यास केला गेला आहे आणि यामुळे आम्हाला राज्यातील प्रमुख कांदळवन आणि नदीच्या किनारी भागात या माशांची विविधता आणि अधिवास समजून घेता आली.

- वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक,कांदळवन कक्ष

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in