अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी २१ हजार अर्ज; ३ लाख जागांवर होणार प्रवेश

मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी ३ लाखांहून अधिक जागा आहेत. या जागांसाठी अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली.
अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी २१ हजार अर्ज; ३ लाख जागांवर होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी ३ लाखांहून अधिक जागा आहेत. या जागांसाठी अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २१ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पहिल्या भागाचा अर्ज भरला आहे.

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेशाची प्रक्रिया मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रात राबविण्यात येते. त्यानुसार या महानगर पालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातून सर्वाधिक २१ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिल्या टप्प्यातील अर्ज भरला. यामध्ये सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाय झाले आहेत.

अकरावीचा ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया दोन भागात विभागलेली आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरावी लागते. विद्यार्थ्यांना शाळा तसेच पालकांच्या मदतीने अकरावी प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा पहिला भाग संकेतस्थळावर ऑनलाईन भरता येतो. भाग १ मध्ये विद्यार्थ्यांना नोंदणी करणे, लॉगइन आयडी, पासवर्ड तयार करणे, तसेच अर्ज आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून प्रमाणित करून विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. तर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग (पसंतीक्रम) दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भराता येतो.

logo
marathi.freepressjournal.in