२१ वर्षीय सिनी शेट्टी ठरली फेमिना मिस इंडिया २०२२

सिनी ही मूळची कर्नाटकची असली तरी मुंबईतच ती लहानाची मोठी झाली असून तिचे शिक्षणही मुंबईतच झाले आहे
२१ वर्षीय सिनी शेट्टी ठरली फेमिना मिस इंडिया २०२२

कर्नाटकच्या सिनी शेट्टीने ‘फेमिना मिस इंडिया २०२२’ हा किताब आपल्या नावावर केला. राजस्थानची रुबल शेखावत ही पहिली रनर-अप तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर-अप ठरली. त्यामुळे सिनी शेट्टीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

२१ वर्षीय सिनी ही मूळची कर्नाटकची असली तरी मुंबईतच ती लहानाची मोठी झाली असून तिचे शिक्षणही मुंबईतच झाले आहे. अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये पदवीधर असलेली सिनी सध्या चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्टचा कोर्स करत आहे. ती एक प्रोडक्ट एक्झिक्युटिव्ह तसेच नृत्यांगना, अभिनेत्री, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने नृत्याला सुरुवात केली. वयाच्या १४व्या वर्षी तिने भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम पूर्ण केले. आता ती एक व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना आहे. लहानपणापासूनच सिनी हिने स्टेज परफॉर्मन्स देण्यास सुरुवात केली. मिस इंडिया होण्यापूर्वी सिनी ‘मिस टॅलेंट’मध्ये उपविजेतीही राहिली आहे. यासह ती एअरटेलच्या जाहिरातीत दिसली आहे. आपण प्रियांका चोप्राची खूप मोठी चाहती असून तिला आपण फॉलो करत असल्याचे सिनी हिने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in