कांदिवलीत २१ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

नैराश्यातूनच त्याने जीवन संपविल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे.
कांदिवलीत २१ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

मुंबई : कांदिवलीत प्रकाश झा ऊर्फ पक्या या २१ वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र मानसिक नैराश्यातून त्याने जीवन संपविल्याचा अंदाज आहे. प्रकाश हा कांदिवलीतील पोईसर परिसरात राहत होता. त्याचे आई-वडिल मनोरुग्ण असून, ते त्यांच्या गावी राहतात. गेल्या काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. नोकरी मिळत नसल्याने तो काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात होता. शनिवारी सकाळी प्रकाशने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसाइड नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. तो मानसिक तणावात होता, त्यातून आलेल्या नैराश्यातूनच त्याने जीवन संपविल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in