वादळी पावसाचा २२ केव्हीला फटका; मुंबईत 'या' ठिकाणी पाणीपुरवठा बंद

सोमवारी दुपारनंतर मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अचानक बरसलेल्या पावसामुळे घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळले, वडाळा येथे मेटल पार्किंग कोसळले.
वादळी पावसाचा २२ केव्हीला फटका; मुंबईत 'या' ठिकाणी पाणीपुरवठा बंद
Published on

मुंबई : सोमवारी दुपारनंतर मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अचानक बरसलेल्या पावसामुळे घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळले, वडाळा येथे मेटल पार्किंग कोसळले. तर पवई येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राल वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आणि विद्युत केंद्रात बिघाड झाला आहे. यामुळे पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कुर्ला, भांडुप विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. विद्युत उपकेंद्राची दुरूस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले आहे.

मुंबईत सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे पवई येथील २२ केव्ही उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या बेमोसमी पावसामुळे पवई परिसरातील विद्युत उपकेंद्रातील अनेक उपकरणांमध्ये बिघाड झाला आहे. अनेक ठिकाणच्या वीज वाहिन्याही तुटल्या असून, अनेक महत्त्वाच्या उपकरणांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अंधारात दुरुस्तीच्या कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे भांडुप विभागातील मोरारजी नगर, जय भीम नगर, पासपोली गावठाण, लोक विहार सोसायटी, रेनेसेन्स हॉटेल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

कुर्ला विभागात काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम सोसायटी, शास्त्रीनगर, गॅस कंपाउंड, चित्रसेन गाव, मसरानी लेन, गाजी दर्गा रोड, ए. एच. वाडिया मार्ग,वाडिया इस्टेट, एम. एन रोड बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, एलबीएस कमानी, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफुर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, ईगलवाडी, आण्णासागर मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, एस जी बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, न्यू मिल रोड मार्ग विनोबा भावे मार्ग, नावपडा, प्रमियर रसिडेन्स, सुंदरबाग, शिव टेकडी संजय नगर, कपाडिया नगर, रूपा नगर, न्यू मिल रोड, ताकिया वॉर्ड, मॅच फॅक्टरी लेन, शिवाजी कुटीर लेन, टॅक्सीमन कॉलनी, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, एलबीएस रोड, चाफे गल्ली, चूनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर आणि जरीमरी माता मंदिर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पालिकेच्या जल विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत वरील परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती झाल्यावर पवई उच्चस्तरीय जलाशय क्रंमाक कप्पा क्रमांक-२ भरून पाणीपुरवठा हळूहळू सुरळीत करण्यात येईल. मुंबईकरांनी दुरुस्तीच्या कालावधीत पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in