पूर्व उपनगरात २२ लाख लिटर भूमिगत पाण्याची टाकी ;घाटकोपर ते भांडुपपर्यंत टेकडीवरील रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी

पार्क साईट परिसरातील नागरिकांनी सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पूर्व उपनगरात २२ लाख लिटर भूमिगत पाण्याची टाकी ;घाटकोपर ते भांडुपपर्यंत टेकडीवरील रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी

मुंबई : घाटकोपर, विक्रोळी, भांडुप येथील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जल वाहिन्या टाकणे, २२ लाख लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८९ कोटी ४२ लाख ३१ हजार १९६ रुपये खर्चणार असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी गळती रोखणे शक्य होणार आहे. तसेच भूमिगत पाण्याच्या टाकीतून आनंद गड, पंचशील सोसायटी, राम नगर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने येथील पाणी समस्या दूर होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जल वाहिन्या ब्रिटीशकालीन असून त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, वेळेत पाणी येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी भांडुप येथील जुन्या जल वाहिन्या बदलत विविध व्यासाच्या नवीन जल वाहिन्या टाकण्यात येणार आहे. तसेच विक्रोळी पार्क साईट सी काॅलनी जवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात २२ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात येणार असून टाकीत पाणी साठवण करण्यासाठी विविध व्यासाच्या नवीन जल वाहिन्या टाकण्यात येणार आहे. तसेच पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामुळे पार्क साईट परिसरातील नागरिकांनी सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पूर्व उपनगरातील परिमंडळ - सहा मधील घाटकोपर (पश्चिम) विक्रोळी (पश्चिम) येथील उंचावर असलेल्या आनंदगड, पंचशिल सोसायटी व राम नगर परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जल वाहिन्या टाकण्यात येणार आहे.

पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार

पूर्व उपनगरातील परिमंडळ - ६ मधील भांडुप जलाशयापासून घाटकोपर भांडुप विभागातील पाणीपुरवठ्याचे विभाजन करण्यासाठी लालबहाहूर शास्त्री मार्गावर ९००>७५० मिमि व्यासाची जल वाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच घाटकोपर (पश्चिम) व विक्रोळी (पश्चिम) येथिल लोवर डेपो पाडा - सागर नगर या उंचावर वसलेल्या लोकवस्तीसाठी पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी विविध व्यासाच्या जलवाहिन्या टाकणे, बदलणे ही कामे करण्यात येणार आहे.

'असे' होणार काम व खर्च ( कोटीत)

-घाटकोपर विक्रोळी नवीन जल वाहिन्या टाकणे, भूमिगत पाण्याची टाकी बांधणे - ४७,०६,८५,८८५

-घाटकोपर भांडुप नवीन जल वाहिन्या टाकणे - ३४,१५,८९,९६०

-घाटकोपर विक्रोळी टेकडीवर पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जल वाहिन्या टाकणे - ८,१९,५५, ३५१

logo
marathi.freepressjournal.in