न्यायालयात हजर करण्यापूर्वीच २२ वर्षांच्या आरोपीचे पलायन

न्यायालयात हजर करण्यापूर्वीच एका २२ वर्षांच्या आरोपीने पलायन केल्याची घटना पार्कसाईट पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे.
न्यायालयात हजर करण्यापूर्वीच २२ वर्षांच्या आरोपीचे पलायन

मुंबई : न्यायालयात हजर करण्यापूर्वीच एका २२ वर्षांच्या आरोपीने पलायन केल्याची घटना पार्कसाईट पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे. पळून गेलेल्या मासुम रफिकउद्दीन याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मंगळवारी दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. चोरीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या मासुम रफिकउद्दीन या २२ वर्षांच्या संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणी करून भांडुप येथील सर्वसाधारण लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या रूममधील छताला असलेले सिमेंटचे पत्रे तोडून मासून पोलीस ठाण्यातून पळून गेला होता. हा प्रकार नंतर गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in