Mumbai: आयआयटी कानपूरच्या २२ वर्षीय ग्रॅज्युएटने माहीममधील अपार्टमेंटमध्ये केली आत्महत्या!

Mahim Suicide Case: हा तरुण ३ बीएचके अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅटमेटसह राहत होता,संध्याकाळी ६ वाजता तो स्वयंपाकघरात लटकलेला आढळला.
Yong Boy Commits Suicide Inside Apartment in mumbai mahim
प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

Yong Boy Commits Suicide Inside Apartment: कानपूर येथील २२ वर्षीय आयआयटी पदवीधर रोहन कुमार झा याने बुधवारी संध्याकाळी मुंबईतील माहीममध्ये आत्महत्या केली. तो गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील एका इन्शुरन्स फर्ममध्ये काम करत होता आणि कॅम्पस रिक्रूटमेंटमधून त्याने ही नोकरी मिळवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण शितला देवी मंदिराजवळील ३ बीएचके अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅटमेटसह राहत होता. संध्याकाळी याच अपार्टमेंटच्या स्वयंपाकघरात ६वाजता लटकलेला अवस्थेत आढळला. त्याच्या मित्रांचे जबाब नोंदवल्यानंतर तो मुंबईत आल्यापासून त्याने कोणाशीही संवाद साधला नसल्याचे पोलिसांना समजले.

नक्की काय घडलं?

बुधवारी संध्याकाळी, रोहनचा एक फ्लॅटमेट मित्र त्याच्या बेडरूममध्ये काम करत असताना त्याला किचनचा दरवाजा बंद दिसला. ते बघून त्याला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवलं. याचमुळे त्याने किचनचं वारंवार दार ठोठावले पण समोरून उत्तर मिळाले नाही. चिंतित होऊन त्याने दुसऱ्या मित्राला बोलवले आणि जोर लावून दार उघडले. दार गुघडल्यावर रोहन पंख्याला लटकलेला दिसला.

याबद्दल माहीम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गुरुवारी शवविच्छेदनानंतर रोहनचे पार्थिव बिहारमधून त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुधाकर शिरसाट यांनी केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे शिरसाट यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in