डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २.२२ कोटी जणांनी केला प्रवास ;मध्य रेल्वेची माहिती

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे म्हणाले की, कोविडपूर्व काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेवर ४२.२९ लाख प्रवासी संख्या होती.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २.२२ कोटी जणांनी केला प्रवास ;मध्य रेल्वेची माहिती

मुंबई : १ ते ५ डिसेंबर या काळात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उपनगरीय प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ दिसली. पाच दिवसांत २.२२ कोटी जणांनी प्रवास केला. म्हणजेच सरासरी ४४.३८ लाख जणांनी प्रवास केला.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे म्हणाले की, कोविडपूर्व काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेवर ४२.२९ लाख प्रवासी संख्या होती. प्रवाशांची वाढती संख्या ही सकारात्मक बाब आहे. यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या काळात रोज सरासरी ३७ लाख प्रवासी प्रवास करत होते, तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या वाढली.

नोव्हेंबर २०२३ मध्ये सरासरी ११.९३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. त्यात उपनगरीय व लांबपल्ल्याच्या गाड्यांचा समावेश होता, तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान मुंबई विभागात ९४.४१ कोटी जणांनी प्रवास केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबई विभागात प्रवाशांच्या संख्येत ८.८७ टक्के वाढ झाली. २०२२ मध्ये ८६.७३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कार्यालये पुन्हा सुरू झाल्याने मुंबई विभागात प्रवाशांची संख्या वाढली आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम व्यवस्था बंद केली आहे. त्यामुळे रेल्वेवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

महसूल वाढला

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने???? वाढत असून एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ४६४९.२२ कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबई विभागाचा महसूल यंदा १३.७२ टक्क्यांनी वाढला. नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रवासी महसूल ३३१.८९ कोटी रुपये मिळाला, तर २०२२ मध्ये नोव्हेंबरमध्ये ३२३.७० कोटी महसूल मिळाला होता. तसेच मालवाहतुकीतून २३८.२५ कोटींचा महसूल नोव्हेंबरमध्ये मिळाला, तर २०२२ मध्ये महसुलात ११.५७ टक्के वाढ झाली, तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ मध्ये म. रेल्वेला १६८५.६३ कोटी महसूल मिळाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत महसुलात १६.६० टक्के वाढ झाली.

logo
marathi.freepressjournal.in