मुंबईत २२२ गोविंदा जखमी;आतापर्यंत १९७ गोविंदांना डिस्चार्ज; २५ गोविंदा रुग्णालयात दाखल

मुंबईत २२२ गोविंदा जखमी;आतापर्यंत १९७ गोविंदांना डिस्चार्ज; २५ गोविंदा रुग्णालयात दाखल

गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले
Published on

दोन वर्षांनंतर मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निर्बंधमुक्त दहीहंडी उत्सव साजरा करताना मुंबईत २२२ गोविंदा जखमी झाले. जखमी गोविंदांना उपचारासाठी पालिकेसह सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २२२ जखमी गोविदांपैकी १९७ गोविंदांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. तर २५ गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व टाळेबंदीमुळे सर्वधर्मीय सण-उत्सवांवर सरकारने कडक बंधने घातल्याने विरजण पडले होते; मात्र कोरोनाला उतरती कळा लागल्याने यंदा प्रत्येक सण उत्साहात साजरा करता येणार आहे. त्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला.

गल्लीबोळात गोविंदांवरही मोफत उपचार

गोविंदा जखमी झाले की, त्यांना ओरियटल कंपनीकडून ७५ रुपयांत १० लाखांचा विमा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या दहीहंडी उत्सव मंडळातील गोविदांसह गल्लीबोळातील गोविंदांना रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. फक्त त्या गोविंदाने मंडळाचा टी शर्ट घातलेला पाहिजे आणि मंडळात कार्यरत आहे हे सिद्ध झाले पाहिजे. तर १०० टक्के मोफत उपचार मिळणार आहे. आजही एखादा गोविंदा जखमी असेल आणि मदत मिळत नसेल तर त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन दहीहंडी उत्सव समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे समन्वयक शिवाजी खैरनार यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in