कोरोनाचे २३५ नवे रुग्ण; शून्य मृत्यू

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ लाख १९ हजार ३०वर पोहोचली आहे. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या
कोरोनाचे २३५ नवे रुग्ण; शून्य मृत्यू
ANI
Published on

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असून रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत १००ने घट होत आहे. सोमवारी रुग्ण संख्येत १६४ ने घट झाली असून २३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ लाख १९ हजार ३०वर पोहोचली आहे. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९,६२४ स्थिरावली आहे. ४३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ९५ हजार ८४९ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ३,५५७ सक्रिय रुग्ण आहेत.

logo
marathi.freepressjournal.in