भटक्या जनावरांवर २४ तास मोफत उपचार;जनावरांसाठी रुग्णालय सुरू करणारी मुंबई महापालिका पहिलीच

हे रुग्णालय सुमारे ४०० लहान प्राण्यांच्या उपचार क्षमतेचे असेल. रुग्णालयात जखमी, आजारी, भटक्या जनावरांवर मोफत उपचार केले जाणार आहे
भटक्या जनावरांवर २४ तास मोफत उपचार;जनावरांसाठी रुग्णालय सुरू करणारी मुंबई महापालिका पहिलीच

मुंबई : गुरं, म्हशी, शेळ्या, मेंढ्या असे एकूण १ लाख १५ हजार तर पाळीव व भटक्या कुत्र्यांची १ लाख ३६ हजार संख्या आहे. मुंबई असलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी महालक्ष्मी येथे सुसज्ज असे ४०० बेड्सचे पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच सेवेत येणार आहे. प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात आले आहे. बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर मुंबई महापालिका व टाटा ट्रस्ट यांच्यात करार झाला आहे. देशात अशा प्रकारे अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणारी मुंबई महापालिका पहिलीच आहे. दरम्यान रुग्णालयाचे लोकार्पण करण्याआधी परिसरात असलेले अतिक्रमण लवकरच हटवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत सुमारे १ लाख १५ हजार पाळीव प्राणी आहेत. या प्राण्यांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी सध्या पालिकेचा खार येथे एकच पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तर मुंबई शहर व उपनगरात सुमारे २०० खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आणि मुंबई सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल संस्थेचे परळ येथे खासगी रुग्णालय आहे; मात्र ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने पालिका स्वतःचे रुग्णालय उभारत आहे.

या रुग्णालयाची उभारणी टाटा ट्रस्टकडून करण्यात आली आहे. तसेच देखभाल, वैद्यकीय सेवाही टाटा ट्रस्ट करणार आहे. देशात अशा प्रकारे अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणारी मुंबई महापालिका पहिलीच आहे. पालिकेने पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी महालक्ष्मी येथे टाटा ट्रस्टला ४३४०.१९ चौरस मीटर जागा दिली आहे. या रुग्णालयात प्राण्यांवर अद्ययावत आणि अत्याधुनिक उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

आजारांचे योग्य निदान वेळीच उपचार

हे रुग्णालय सुमारे ४०० लहान प्राण्यांच्या उपचार क्षमतेचे असेल. रुग्णालयात जखमी, आजारी, भटक्या जनावरांवर मोफत उपचार केले जाणार आहे. भटक्या जनावरांना २४ तास मोफत रुग्णवाहिकेची सेवा असणार आहे. शस्त्रक्रिया, गायनॉकोलॉजी, अपघात, इमर्जन्सी वॉर्ड, आयसीयू, आसीसीयू, कॅन्सर वॉर्ड, बर्न ॲण्ड स्कीन वॉर्ड, ओपीडी मेडिसिन-ओपीडी, सीटी स्कॅन, एमआरआय, रेडिओलॉजी सोनोग्राफी, ब्लड बँक, डायलेसिस सेंटर अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in