२५ प्लेट समोसे पडले १.४० लाखाला! मुंबईच्या डॉक्टरला घातला ऑनलाईन गंडा

डॉक्टरने २५ प्लेट समोसे ऑर्डर केले होते. यावेळी ऑनलाईन पेमेंट करताना त्यांच्या खात्यातून १.४० लाख रुपये रक्कम कमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
२५ प्लेट समोसे पडले १.४० लाखाला! मुंबईच्या डॉक्टरला घातला ऑनलाईन गंडा

सायबर क्राईम वाल्यांनी अनेकांना गंडा घातल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना मुंबईतल्या एका डॉक्टर सोबत घडली आहे. एका डॉक्टरला १.४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या डॉक्टरला घरी बसल्या समोसे खाण्याची इच्छा चांगलीच महागात पडली आहे. मुंबईतील एका डॉक्टरने २५ प्लेट समोसे ऑर्डर केले होते. मात्र, हे समोसे या डॉक्टरला १.४० लाखाला पडले आहेत.

डॉक्टरने २५ प्लेट समोसे ऑर्डर केले होते. यावेळी ऑनलाईन पेमेंट करताना त्यांच्या खात्यातून १.४० लाख रुपये रक्कम कमी झाली आहे. ज्या हॉटेलमधून डॉक्टरने हे समोसे मागवले होते. त्यांनी फत्त १५०० रुपये देण्यास सांगितले होते. परंतु त्यांच्या खात्यातून १.४० लाख रुपये कट झाले. डॉक्टरांनी याप्रकरणी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

हे २७ वर्षीय डॉक्टर मुंबईच्या सायन येथील केईएम रुग्णलयात नोकरी करत असल्याचे भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. ते शनिवारी पिकनिकला जाणार असल्याने त्यांनी गुरुकृपा हॉटेलला फोन करुन २५ प्लेट समोसे ऑर्डर केले. हॉटेल वाल्यांनी त्यांना फोनवर १५०० रुपये देण्यास सांगितलं.

यानंतर डॉक्टरने १५०० रुपये पेमेंट केलं असल्याचं सांगितलं. मात्र हॉटेलकडून त्यांना पैसे मिळाले नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांना पेमेंट करण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली. यानंतर त्यांच्या खात्यातून २८ हजार रुपये कट झाले. याता तपास घेत असतानाच त्यांना त्यांच्या खात्याशी संबंधीत एकामागून एक मेसेज आले. यानंतर त्यांना खात्यातून १.४० लाख रुपये कट झाल्याचं कळलं. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं कळताच डॉक्टरांनी भोईवाडा पोलीस स्टेशन गाठत तक्रात दाखल केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in