कंटेनरच्या धडकेत २५ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
कंटेनरच्या धडकेत २५ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू
Published on

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका कंटेनरच्या धडकेने नीरज कैलास गुप्ता या २५ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास गोरेगाव येथील पवईकडून जाणाऱ्या जेव्हीएलआर रोड, पामेरीनगर जवळील जोगेश्‍वरीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर झाला. नीरज एअरटेल कंपनीत टेक्निशियन म्हणून कामाला असून कंपनीच्या डेटा सेंटरमधील नेटवर्कबाबत काही अडचणी असल्यास ते दूर करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. शनिवारी तो कामानिमित्त अंधेरी येथे बाईकवरून जात असताना रात्री उशिरा दोन वाजता भरवेगात जाणाऱ्या एका कंटेनरने त्याच्या बाईकला धडक दिली. नीरज ट्रकच्या चार चाकांमध्ये अडकल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी खासगी क्रेनसह फायरबिग्रेडची मदत घेतली होती. मात्र बाहेर काढल्यानंतर ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in