बेस्टचा २,५१३.९४ कोटी तुटीचा अर्थसंकल्प पालिकेच्या स्थायी समितीला सादर

बेस्ट उपक्रमाचा गाडा हाकण्यासाठी पालिकेकडे ३ हजार कोटींची मागणी केली असून पालिकेच्या अर्थसंकल्पात किती तरतूद करणार, याकडे बेस्टचे लक्ष लागले आहे.
बेस्टचा २,५१३.९४ कोटी तुटीचा अर्थसंकल्प  पालिकेच्या स्थायी समितीला सादर

मुंबई : बेस्ट उपक्रमाचा सन २०२४-२५ चा २,५२३.९४ कोटींचा अर्थसंकल्प मंगळवारी पालिकेच्या स्थायी समितीला सादर करण्यात आला. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांना हा अर्थसंकल्प सादर केला.

बेस्ट उपक्रमाचा गाडा हाकण्यासाठी पालिकेकडे ३ हजार कोटींची मागणी केली असून पालिकेच्या अर्थसंकल्पात किती तरतूद करणार, याकडे बेस्टचे लक्ष लागले आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाज २,५१३.९४ कोटी एवढी तूट दर्शवली आहे. तर सन २०२३-२४ च्या वर्षांसाठी सुधारित अंदाज १,६०१.८० कोटी एवढी तूट दर्शवली आहे. परंतु महानगरपालिकेकडून ८०० कोटी अनुदान मिळणार असल्यामुळे तूटीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास बेस्ट उपक्रमाकडून व्यक्त करण्यात आला.

सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ६,८७२.७६ कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. तर सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय वर्षांत ९,३८६.७० इतका खर्च अपेक्षित असल्याचे या अर्थसंकल्पीय वर्षांत नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in