महाप्रीत हरितनिधी गुंतवणूक बैठकीत २५,३६१ कोटींचा सामंजस्य करार

महाप्रीत कंपनी सौरऊर्जासह अनेक प्रकल्प राबवत आहे, हे खूप कौतुकास्पद आहे
महाप्रीत हरितनिधी गुंतवणूक बैठकीत २५,३६१ कोटींचा सामंजस्य करार

महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादितने मुंबईत आयोजिलेल्या महाप्रीत हरितनिधी गुंतवणूक बैठकीत विविध २२ प्रकल्पांसाठी तब्बल २५ हजार ३६१ कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रूरल इलेक्िट्रफिकेशन कॉर्पोरेशन, इरेडा , ग्रो बेटर अॅग्री ओव्हरसीज, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्यासह अनेक नामवंत कंपन्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन पर भाषणात सांगितले की “महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या प्रकल्पांमुळे नागपूर महानगरपालिका आणि महाप्रित यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत पात्र स्थानिक उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास मदत होऊन समाजातील दुर्बल घटकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदघाटन पर भाषणात सांगितले की “महाप्रीत कंपनी सौरऊर्जासह अनेक प्रकल्प राबवत आहे, हे खूप कौतुकास्पद आहे. महाप्रीतने ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट -२०२२ आयोजित केली आहे.

या बैठकीला महाप्रीतचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, बी.एस.सी चे चेअरमन व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी उपगव्हर्नर सुभाष मुन्द्रा, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव(नि)के. पी. बक्षी, डॉ. विजय सतबीर सिंग, उमाकांत दांगट (नि), अतिरिक्त पोलीस महासंचालक (नि) धनंजय कमलाकर, अखिल भारतीय इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कलंत्री, डॉ. दीपक म्हैसेकर, इर्डाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार दास, ईबीटीएसचे व्यवस्थापकीय संचालक पॉल जेसेन, एनआयआयएफचे अजय सक्सेना, डॉ. एस. एस. मंथा, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश ढिंगळे, आयसीएआयचे निलेश विकमसी, महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम-पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in