Mumbai : पालिकेच्या २७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू होणार

मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Mumbai : पालिकेच्या २७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू होणार
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

२००८ च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. यासाठी 'म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने'चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. शिवसेना-उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुढाकार घेऊन आयुक्तांना विनंती केल्यामुळे मंगळवारी निर्णायक बैठक झाल्याची माहिती कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे बापेरकर यांनी दिली.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००४ पासून 'जुनी पेंशन' योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना चालू केली होती. त्याच धर्तीवर प्रथम राज्य शासनाने व नंतर मुंबई महापालिकेने अनुक्रमे १ नोव्हेंबर २००५ व ५ मे २००८ पासून कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

logo
marathi.freepressjournal.in