विनातिकीट, अंतरापेक्षा जास्त प्रवास पडला महागात २७.३२ लाख फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या ;सात महिन्यात १७६.१७ कोटींचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास आणि इतर अनियमिततेमुळे महसुलावर होणाऱ्या परिणामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष असते.
विनातिकीट, अंतरापेक्षा जास्त प्रवास पडला महागात  २७.३२ लाख फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या ;सात महिन्यात १७६.१७ कोटींचा दंड वसूल

मुंबई : विनातिकीट कायद्याने गुन्हा आहे, असा इशारा जवळपास प्रत्येक स्थानकात उद्घोषणेद्वारे देण्यात येतो. मात्र वारंवार सूचना करूनही विनातिकीट, अंतरापेक्षा जास्त प्रवास, आरक्षण न करता जादा लगेज घेऊन जाणे अशा तब्बल २७.३२ लाख फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या.

विनातिकीट, अंतरापेक्षा जास्त प्रवास आरक्षण न करता लगेज घेऊन जाणे अशा लोकांच्या विरोधात मध्य रेल्वेची कारवाई सुरू असून ही मोहीम पुढेही सुरूच राहील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी सुरूच असते.

विनातिकीट प्रवास आणि इतर अनियमिततेमुळे महसुलावर होणाऱ्या परिणामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष असते. सन २०२३-२४ मध्ये एप्रिल-ऑक्टोबर २०२३ साठी विनातिकीट, अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २७.३२ लाख प्रकरणे एप्रिल-ऑक्टोबर २०२३ मध्ये आढळून आली. तसेच तिकीट तपासणीस विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत १७६.१७ कोटी रुपये दंड वसूल केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in