मुंबर्इ विमानतळावर ३ किलो सोने जप्त

पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे.
मुंबर्इ विमानतळावर ३ किलो सोने जप्त

मुंबर्इ : मुंबर्इ विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत एकूण ३.१७६ किलो २४ कॅरेट सोने गुरुवारी जप्त केले. एका प्रवाशाने आपल्या अंतर्वस्त्राच्या पट्ट्यामध्ये २४ कॅरेट सोन्याची धूळ लपवून ठेवली होती, तर थोडी धूळ पायाच्या तळव्याला चिकटवली होती. हा भारतीय प्रवासी शारजाहून मुंबर्इला आला होता. या प्रवाशाने एकूण १.७९ किलो सोन्याची धूळ लपवून आणली होती, तर दुसऱ्या प्रकरणात याच दिवशी मुंबर्इ विमानतळावर एका प्रवाशाकडून २४ कॅरेट सोन्याचे कच्चे तुकडे जप्त करण्यात आले. हा प्रवासी देखील भारतीय नागरिक होता आणि तो शारजाहूनच मुंबर्इला आला होता. त्याने पास्ता तयार करण्याची मशीन आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये सोन्याचे तुकडे लपवून आणले होते. सोने तस्करीची ही दोन्ही प्रकरणे स्वतंत्र असून त्यांचा एकमेकांशी काही संबंध नसल्याचे चौकशीअंती आढळून आले आहे. तरी देखील याबाबत पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in