१४ व्या मजल्यावरून पडून,३० वर्षांच्या कामगाराचा मृत्यू

मुझफ्फर हुसैन हा मूळचा कोलकाताच्या दिनाजपूरचा रहिवाशी आहे. सध्या तो मुंबईत राहत असून अहलुवालिया कॉट्रेक्स इंडिया लिमिटेड कंपनीसाठी मजुरीचे काम करतो.
१४ व्या मजल्यावरून पडून,३० वर्षांच्या कामगाराचा मृत्यू

मुंबई : १४व्या मजल्यावरुन पडून मुझफ्फर अब्दुल रौफ हुसैन या ३० वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शीव रुग्णालयातील डीन कार्यालयातील इमारतीमध्ये घडली. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर सुल्तान अली याच्याविरुद्ध शीव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मुझफ्फर हुसैन हा मूळचा कोलकाताच्या दिनाजपूरचा रहिवाशी आहे. सध्या तो मुंबईत राहत असून अहलुवालिया कॉट्रेक्स इंडिया लिमिटेड कंपनीसाठी मजुरीचे काम करतो. या कंपनीचे शीव रुग्णालयातील डीन कार्यालय इमारतीच्या मागील बाजूचे बांधकाम सुरू होते. तिथे मुझफ्फर कामाला असताना १० फेब्रुवारीला सकाळी पावणेअकरा वाजता तो चौदाव्या मजल्यावर काम करत होता. काम करताना त्याच तोल गेला आणि तो १४व्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर पडला. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला इतर कामगारांनी तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच शीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर सुल्तान अलीने तिथे काम करणाऱ्या कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना केली नव्हती. कामगारांना सेफ्टी बेल्ट, रोप, हेल्मेट आणि इतर साहित्य पुरविण्यात आले होते. त्याच्या हलगर्जीपणामुळे मुझफ्फर हुसैन या कामगाराचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in