मुंबई : उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई ते थिवी ३२ स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात १६ वातानुकूलित साप्ताहिक फेऱ्या असणार आहेत.
उन्हाळी सुट्टी पडल्याने बहुतांश लोक गावी जातात. गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत असते. तसेच नियमीत गाड्यांचे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळेच मुंबई ते थिवी ३२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करणे शक्य होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवी-लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित साप्ताहिक विशेष १६ फेऱ्या चालवल्या जातील.
०११८७ वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १८ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर गुरुवारी १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९.५० वाजता थिवी येथे पोहोचेल. (८ फेऱ्या)
०११८८ वातानुकूलित साप्ताहिक विशेष थिवी येथून १९ एप्रिल ते ७ जूनपर्यंत दर शुक्रवारी ४.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (८ फेऱ्या)
या स्थानकावर थांबा
ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवी-लोकमान्य टिळक टर्मिनस सेकंड सीटिंग साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या)
०११२९ सेकंड सीटिंग विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २० एप्रिल ते ८ जून पर्यंत दर शनिवारी १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता थिवी येथे पोहोचेल. (८ फेऱ्या)
०११३० सेकंड सीटिंग विशेष थिवी येथून २१ एप्रिल ते ९ जूनपर्यंत दर रविवारी ४.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (८ फेऱ्या)
उन्हाळी विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग १३ एप्रिल रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.