३२ लाखांचा मालाची चोरी करून नोकराचे पलायन

सत्यवान हा मूळचा उत्तरप्रदेशच्या फतेहपूरचा रहिवाशी असून, त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच उत्तरप्रदेशाला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले
३२ लाखांचा मालाची चोरी करून नोकराचे पलायन

मुंबई : सुमारे ३२ लाखांच्या मालाची चोरी करून सत्यवान रामनारायण सोनी नावाच्या नोकराने पलायन केले. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या नोकराचा शोध सुरू केला आहे. सत्यवान हा मूळचा उत्तरप्रदेशच्या फतेहपूरचा रहिवाशी असून, त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच उत्तरप्रदेशाला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरज बाबूलाल सोनी हे वांद्रे येथे राहत असून, त्यांचा मशिदबंदर येथे निलम गारमेंट नावाचे एक दुकान आहे. त्यांचा कपड्याचा विक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय असून, त्यांचे वडिल बाबूलाल सोनी हे दुकानाचे मालक आहेत. त्यांच्याकडे सहा कामगार कामाला असून, त्यापैकी सत्यवान हा गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्याकडे कामाला होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. दुकानातील सर्व मालाची देखरेख करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. नोव्हेंबर महिन्यांत सुरज सोनी हे दुकानातील सीसीटिव्ही फुटेज पाहत असताना त्यांना दुकानातील कपड्याचे काही माल दिसून आले नाही. याच दरम्यान सत्यवान हा महत्त्वाचे काम असल्याचे सांगून उत्तरप्रदेशला निघून गेला होता

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in