स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून ३४ लाखांची फसवणूक

कारसाठी टप्याटप्याने आठ लाख अकरा हजार रुपये घेतले
स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून ३४ लाखांची फसवणूक

मुंबई : स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून आर्मीच्या एका निवृत्त सुभेदारासह पाचजणांची सुमारे ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार भायखळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी माझगाव कोर्टाच्या आदेशावरुन भायखळा पोलिसांनी तीन ठगाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पंकजकुमार रामविलास ठाकूर, अमीतकुमार यादव आणि रामविलास ठाकूर अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरेश भिवा विचारे (५८) हे अंबरनाथ येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत असून, ते आर्मीतून सुभेदार म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना टाटा कंपनीची ऍल्ट्रोज कार खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांची ओळख पंकजकुमार ठाकूरशी झाली होती. तो सिमरन मोटर्स पनवेल येथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. त्याने पनवेल येथील एजन्सीमध्ये चांगली ओळख असून, त्यांना स्वस्तात कार देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून कारसाठी टप्याटप्याने आठ लाख अकरा हजार रुपये घेतले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in