हॉटेलच्या कॅशिअरकडून ३५ लाखांचा अपहार

वार्षिक ताळेबंदामध्येही त्याने साडेचौदा लाखांचा अपहार केल्याचे समोर आले
हॉटेलच्या कॅशिअरकडून ३५ लाखांचा अपहार

मुंबई : सुमारे ३५ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी फिस्को हब हॉटेलचा कॅशिअर गौतमकुमार राजकिशोर गुप्ता याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेअरमध्ये गुंतवणुकीचे आमिषाने गौतमकुमारने पाचहून अधिक कर्मचाऱ्यांनी २९ लाख १२ हजारांची तसेच हॉटेलमध्ये काम करताना बोगस बिल बनवून १४ लाख ६५ हजारांचा आर्थिक घोटाळा केला आहे. अशाप्रकारे त्याने ३५ लाख ७७ हजार ८६० रुपयांच्या अपहारासह फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याने शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी रोहनकुमार नंदकुमार सावंत याच्याकडून १० लाख रुपये, रोशन पाटीलकडून १० लाख रुपये, रुचिता अंकुश मोरेकडून साडेपाच लाख रुपये आणि विनय मिठाईलाल यादव कडून ६७ हजार रुपये घेतले होते. मात्र नफा न देता पैशांचा अपहार केल्याचे लक्षात येताच, तसेच वार्षिक ताळेबंदामध्येही त्याने साडेचौदा लाखांचा अपहार केल्याचे समोर आले. त्यामुळे फिस्को हब बारचे मालक रुषी चिंतामण माळी यांच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in