स्वत:चं केला ३५ लाखांच्या चोरीचा बनाव ; पोलिसांनी असा लावला छडा

पोलिसांनी दोन तासात या प्रकरणाचा उलगडा केला आणि बनाव रचणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.
स्वत:चं केला ३५ लाखांच्या चोरीचा बनाव ; पोलिसांनी असा लावला छडा

मुंबईतील अंधेरी पूर्वमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. स्वतःचेचं पैसे चोरीला गेल्याचं डाव रचला आहे. 32 वर्षीय आरोपीने मध्य मुंबईतील माटुंग्यात ही चोरी झाल्याचं सांगितलं. परंतु पोलिसांनी दोन तासात या प्रकरणाचा उलगडा केला आणि बनाव रचणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

अंधेरी पूर्व इथे वास्तव्यास असलेला अजित पटेल हा बुधवारी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने नप्पू रोडवरील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी 35 लाख रुपये ठेवलेली माझी बॅग पळवून घेऊन गेले, अशी तक्रार केली. यानंतर माटुंगा पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. घडलेल्या घटनेबाबत आणखी माहिती मिळवण्यासाठी अजित पटेल आणि त्याच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीची विचारपूस करायला सुरुवात केली.

पोलिसांनी या दोघांची वेगवेगळी कसून चौकशी केल्यावर तपासात धक्कादायक प्रकार समोर आला. ज्या चोरीच्या घटनेबद्दल ते बोलत आहेत, त्यात खूप तफावत आढळली. अजित पटेलने सांगितलेल्या घटनास्थळी पोलीस पोहोचले. आजूबाजूच्या सीसीटीव्हीची तपासणी केली. परंतु या ठिकाणी अशी कोणतीही लूट झाली नसल्याचं त्यांना दिसलं. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी अजित पटेल यांच्या मोबाईल फोनची तपासनी केली. तांत्रिक विश्लेषणात हा संशय अधिक बळावला.

पोलिसांना जेव्हा खरं समजलं तेव्हा अजितने गुन्हाची कबुली दिली. त्याच्यासोबत आलेला दुसरा व्यक्ती चालक असल्याचं समोर आलं. पटेलने पोलिसांना सांगितलं की, मी एक फ्लॅट खरेदी केला होता. आमच्यात व्यवहार झाला होता. रक्कम न दिल्यास हा सौदा फिस्कटणार होता. पण मला त्यासाठी 35 लाख रुपये जमा करण्यात अपयश आलं. यानंतर मी चोरीची कहाणी तयार केली, जेणेकरुन ही रक्कम फेडण्यासाठी मला आणखी थोडा वेळ मिळेल. परंतु पोलिसांनी ही बाब लक्षात आली आणि त्याचा डाव पोलिसांनी फिस्कटवाला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावरच कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in