सोमालियाचे ३५ चाचे जेरबंद; नौदलाचे ४० तास ऑपरेशन‌; मुंबई पोलिसांकडे केले स्वाधीन

भारतीय नौदलाच्या जोरदार कारवाईमुळे ३५ चाचे व १७ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. त्यांना भारतीय नौदलाच्या जहाजावरून मुंबईत आणले. या कारवाईनंतर भारतीय नौदलाने चाच्यांचे जहाज ताब्यात घेतले. त्यांचा शस्त्रसाठा, दारुगोळा ताब्यात घेतला.
सोमालियाचे ३५ चाचे जेरबंद; नौदलाचे ४० तास ऑपरेशन‌; मुंबई पोलिसांकडे केले स्वाधीन

मुंबई : सोमालियाच्या समुद्रात चाचेगिरी करणाऱ्या ३५ चाच्यांना भारतीय नौदलाने धडक कारवाई करत पकडले. नौदलाची युद्धनौका आयएनएस कोलकाताने या चाच्यांना मुंबईत आणले असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

भारतीय नौदलाने सांगितले की, जगातील व्यापाऱ्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या अरबी समुद्रात व एडनच्या आखातात ‘ऑपरेशन संकल्प’अंतर्गत भारतीय नौदल तैनात केले आहे. या भागातील चाच्यांवर भारतीय नौदलाकडून कारवाई केली जात आहे.

१५ मार्च रोजी जवळपास ४० तासांचे हे थरारक ऑपरेशन पार पाडले. भारतीय नौदलला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अरबी समुद्रात एमवी रुएन हे जहाज रोखण्यात आले. या जहाजाचा वापर व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी केला जात होता. १५ मार्चला जहाजावर भारतीय नौदलाची करडी नजर होती.

भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकात्ताने तातडीने कारवाईला सुरुवात केली. अनेक सशस्त्र चाचे सोमालियाच्या बोटीवर होते. आयएनएस कोलकाताने चाच्यांच्या बोटींना थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, या बोटीतून गोळीबार सुरू झाला. त्यानंतर आयएनएस कोलकातावरून स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देण्यात आले. अखेर चाच्यांनी शरणागती पत्करली. आयएनएस कोलकात्त्याच्या मदतीला आयएनएस सुभद्रा ही मदतीला आली. या कारवाईसाठी नौदलाने मरीन कमांडोंचाही वापर केला. तसेच भारतीय हवाई दलाचीही मदत घेण्यात आली. ‘भारतीय नौदला’च्या पी८आय विमान, समुद्री ड्रोन व हेलिकॉप्टर आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला.

भारतीय नौदलाच्या जोरदार कारवाईमुळे ३५ चाचे व १७ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. त्यांना भारतीय नौदलाच्या जहाजावरून मुंबईत आणले. या कारवाईनंतर भारतीय नौदलाने चाच्यांचे जहाज ताब्यात घेतले. त्यांचा शस्त्रसाठा, दारुगोळा ताब्यात घेतला.

logo
marathi.freepressjournal.in