चीनी सीमेवर ३५ हजार भारतीय सैनिक तैनात

चीनी सीमेवर ३५ हजार भारतीय सैनिक तैनात

भारतीय लष्कराने लडाख सेक्टरमधून ३५ हजार सैनिकांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्थलांतरित केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे.

वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले की, दोन वर्षांपासून ३५ हजार सैनिक चीन सीमेवर तैनात केले. यातील काही सैनिक हे दहशतवादविरोधी कारवाईत सक्रिय होते.राष्ट्रीय रायफल्सची एक डिवीजनला जम्मू-काश्मीरमधून दहशतवादीविरोधी कारवाईतून मुक्त करून त्यांना लडाख विभागात तैनात केले. तर तेजपूर स्थित गजराज डिव्हीजनकडे चीनच्या सीमेवर देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी चीनने भारतीय चौक्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर सैनिक स्थलांतरित करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने आपले सैन्याचे पुर्नसंतुलन व पुर्नगठन करत आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सीमेपेक्षा जास्त आव्हान आता चीनच्या सीमेवर आहे. तसेच पूर्व लडाख विभागात सैनिकांकडून अत्यंत थंडीमुळे अतिरिक्त सराव करून घेतला जातो. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत व चीनचे सैनिक अनेक वर्षांपासून समोरासमोर उभे ठाकले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in