पुर्नविकासाच्या नावाने महिलेची ३७ लाखांची फसवणूक

पुर्नविकासाच्या नावाने महिलेची ३७ लाखांची फसवणूक

रहिवाशांशी चर्चा केल्यानंतर इमारतीच्या मालकांनी पुर्नविकासाठी समीर तन्नासोबत एक करार झाला होता.

मुंबई : पुर्नविकासाच्या नावाने घरभाड्यासह अतिरिक्त जागेसाठी घेतलेल्या सुमारे ३७ लाखांचा अपहार करून विकासकाने एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार सांताक्रुझ परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी समीर धीरेंद्र तन्ना या विकासकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. त्याच्याविरुद्ध इमारतीच्या मालकाने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर केली असून, या याचिकेवर सुनावणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सांताक्रुझ येथील प्रभात कॉलनी, विकी अपार्टमेंटमध्ये तक्रारदार ७५ वर्षांची महिला राहत असून, २०१३ साली समीर तन्ना यांनी इमारतीच्या मालकासह चौदा रहिवाशांसोबत एक मिटींग घेऊन तिथे पुर्नविकासासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. याबाबत रहिवाशांशी चर्चा केल्यानंतर इमारतीच्या मालकांनी पुर्नविकासाठी समीर तन्नासोबत एक करार झाला होता. या करारात नवीन इमारतीमध्ये प्रत्येक सभासदाला ४६८ चौ. फुटाचे देण्याचे मान्य करुन दरमाह घरभाडा म्हणून २५ हजार रुपये देण्याचे नमूद केले होते; मात्र करारानुसार समीर तन्ना याने संपूर्ण इमारत खाली केल्यानंतर तिच्यासह कुठल्याही सभासदाला घरभाडे दिले नाही. तिची घरभाड्यापोटी २० लाख २५ हजाराची थकबाकी असून वारंवार विचारणा करुनही विकासक समीर तन्ना याच्याकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in