३७ लाखांच्या दागिन्यांचा अपहार करून फसवणूक

फसवणूक केल्याप्रकरणी हैद्राबादचा ज्वेलरी व्यापारी निखील अग्रवाल याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
३७ लाखांच्या दागिन्यांचा अपहार करून फसवणूक

मुंबई : क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ३७ लाख रुपयांच्या डायमंड ज्वेलरीचा अपहार करून एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हैद्राबादचा ज्वेलरी व्यापारी निखील अग्रवाल याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. प्रफुल्ल सुकनराज जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून, त्यांचा डायमंड ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय आहे. झव्हेरी बाजार परिसरात त्यांचे हर्ष जेम्स मॅन्युफॅक्चर ऑफ डायमंड स्टुडिड ज्वेलरी नावाचे एक दुकानासह कार्यालय आहे. फेब्रुवारी महिन्यांत त्यांनी गोरेगाव येथील नेक्सो सेंटरमध्ये ज्वेलरीचे एक प्रदर्शन ठेवले होते. त्यात मुंबईसह देशभरातून अनेक व्यापारी आले होते. त्यात हैद्राबादचे रुद्र ज्वेल्सचे मालक निखील आणि त्यांचा मॅनेजर पुनित मेहता यांचा समावेश होता. याच प्रदर्शनात त्यांची निखीलसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी त्यांच्याकडे काही डायमंड ज्वेलरीची ऑर्डर दिली होती. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी निखीलला साठ दिवसांच्या क्रेडिटवर ३७ लाख ६७ हजार रुपयांचे ज्वेलरी विक्रीसाठी दिले होते; मात्र साठ दिवसांत त्यांनी ज्वेलरीचे पेमेंट किंवा ज्वेलरी परत केले नाही. लवकरच पेमेंट करतो असे सांगून ते दोघेही त्यांना सतत टोलवाटोलवी करत होते. दिलेल्या मुदतीत त्यांच्याकडून पेमेंट मिळाले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत निखीलविरुद्ध तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in