हार्बर मार्गावर ३८ तासांचा जम्बो ब्लॉक सीएसएमटी - पनवेल शेवटची लोकल ९.०२ ची पनवेल - ठाणे शेवटची लोकल ९.२० ची

२ नवीन लाईनच्या बांधकामासाठी पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंगचे कामासाठी ३८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार
हार्बर मार्गावर ३८ तासांचा जम्बो ब्लॉक सीएसएमटी - पनवेल शेवटची लोकल ९.०२ ची पनवेल - ठाणे शेवटची लोकल ९.२० ची

मुंबई : डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर (वगळून) आणि पनवेल (यासह) दरम्यान अप आणि डाउन मार्गावर शनिवार ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत ३८ तासांचा जंम्बो ब्लाॅक घेण्यात आला आहे. जंम्बो ब्लॉक सुरु होण्याआधी सीएसएमटी - पनवेल शेवटची लोकल सीएसएमटीहुन शनिवारी रात्री ९ वाजून २ मिनिटांची असणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल - ठाणे लोकल पनवेल स्थानकातून १०.३५ वाजता शेवटची असेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पनवेल स्टेशनवर अप आणि डाउन मार्गावर बेलापूर (वगळून) आणि पनवेल (यासह) दरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन्स आणि नॉन-इंटरलॉकिंगसह विद्यमान अप आणि डाउन हार्बर लाईन्स कट आणि जोडण्यासाठी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अप आणि डाउन २ नवीन लाईनच्या बांधकामासाठी पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंगचे कामासाठी ३८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार, ३० सप्टेंबर ते सोमवार २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत घेण्यात आला आहे.

ब्लॉक कालावधीत लोकल सेवेवर परिणाम !

- ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद असणार आहे.

-हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय लोकल बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.

- ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय लोकल ठाणे - नेरुळ - वाशी स्थानकांदरम्यान धावतील.

-ब्लॉक सुरू होण्यापूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९.०२ वाजता सुटेल आणि पनवेलला १०.२२ वाजता पोहोचेल.

- ब्लॉकच्या आधी पनवेलहून अप हार्बर मार्गावरून सुटणारी शेवटची लोकल २२.३५ वाजता पनवेलहून सुटेल आणि ३० सप्टेंबर रोजी २३.५४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

- ब्लॉकपूर्वी डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून ९.३६ वाजता सुटेल आणि १०.२८ वाजता पनवेलला पोहोचेल.

-ब्लॉकच्या आधी ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची अप लोकल २१.२० वाजता सुटेल आणि ३०.०९.२०२३ रोजी ठाण्याला २२.१२ वाजता पोहोचेल.

ब्लॉक नंतरची लोकल सेवा!

-पनवेलसाठी सीएसएमटी स्थानकातून ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन १२.०८ वाजता सुटेल आणि सोमवारी दुपारी १.२९ वाजता पनवेलला पोहोचेल.

-ब्लॉकनंतर पनवेलहून सीएसएमटीसाठी पहिली लोकल पनवेलहून १.३७ वाजता सुटेल आणि दुपारी २.५६ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

- ठाणे ते पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी १.२४ वाजता ठाण्याहून सुटेल आणि २.१६ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.

-ब्लॉकनंतर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल पनवेलहून २.०१ वाजता सुटेल आणि ठाण्याला २.५४ वाजता पोहोचेल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in