मालाडमध्ये विजेच्या धक्क्याने ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मालाड पूर्वेला बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का बसल्याने एक जण थेट २५ फूट खोल नाल्यात पडला. या व्यक्तीला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मालाडमध्ये विजेच्या धक्क्याने ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Published on

मुंबई - मालाड पूर्वेला बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का बसल्याने एक जण थेट २५ फूट खोल नाल्यात पडला. या व्यक्तीला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नाल्यानजीकच्या वीजवाहिनीतील वीजप्रवाहाचा धक्का या व्यक्तीला कसा बसला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पूर्वेच्या त्रिवेणी नगर रस्त्यावर ज्योती हॉटेलनजीक ही दुर्घटना घडली. पारेख नगर उद्यानाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या रस्त्यानजीकच्या नाल्यात एकजण विजेचा धक्का लागून पडल्याची माहिती अग्निशमन दलास कळविण्यात आली. हा नाला सुमारे २५ फूट खोल आणि १० फूट रुंदीचा आहे. या व्यक्तीला तेथील रहिवाशांनी शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत म्हणून घोषित केले. चौकशीअंती त्याचे नाव कमलेश चंद्रकांत शिताब (३९) असे असल्याचे समजले. त्याला विजेचा धक्का कसा लागला हे समजू शकले नाही. पण, या भागात बेकायदा वीजजोडण्या देण्याचे काम काहीजण करीत आहेत. त्याच्याशी हे प्रकरण संबंधित आहे काय, या दृष्टीने तपास केला जात आहे. 

logo
marathi.freepressjournal.in