तिसरे समाज साहित्य विचार संमेलन मुंबईत

संमेलनात ग्रंथ प्रकाशन, निमंत्रित कविसंमेलन होणार असून, अध्यक्षा कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो आहेत.
तिसरे समाज साहित्य विचार संमेलन मुंबईत

मुंबई : समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे आयोजित तिसरे समाज साहित्य विचार संमेलन १६ डिसेंबर रोजी सायं ४.३० वा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक, साहित्यिक प्रा. नितीन रिंढे यांची निवड करण्यात आली असून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात संस्थेतर्फे आयोजित केलेल्या जयंत पवार कथा स्पर्धेचे पुरस्कार बार्शी येथील ऐश्वर्या रेवडकर यांच्या 'एका आत्महत्येची तयारी' व बुलढाणा येथील जयदीप विघ्ने यांच्या 'सटवा' या कथांना प्रदान करण्यात येणार आहेत.

संमेलनात ग्रंथ प्रकाशन, निमंत्रित कविसंमेलन होणार असून, अध्यक्षा कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो आहेत. अविनाश गायकवाड (मुंबई), वर्जेश सोलंकी, फेलेक्स डिसोझा, महेश लिला पंडित, संगीता अरबुने (विरार), रमेश सावंत, विजय सावंत (मुंबई), जिजा शिंदे (छत्रपती संभाजीनगर - औरंगाबाद), अंजली ढमाळ, बालिका ज्ञानदेव (पुणे), प्रियदर्शनी पारकर, डॉ. दर्शना कोलते, संतोष जोईल, मनीषा पाटील, प्रमिता तांबे, ॲड मेघना सावंत, अॅड. प्राजक्ता शिंदे (सिंधुदुर्ग) सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in