ॲॅमेझॉन डाटा सर्व्हिसेसकडून पवईत ४ एकर जागा भाड्याने

भाड्यात दरवर्षी ३ टक्के वाढ केली जाईल
ॲॅमेझॉन डाटा सर्व्हिसेसकडून पवईत ४ एकर जागा भाड्याने

मुंबई : ॲॅमेझॉन डाटा सर्व्हिसेसने पवईत ४ एकर जागा भाड्याने घेतली आहे. पवईतील लार्सन ॲॅण्ड टुब्रोची ही जागा आहे. ॲॅमेझॉन या जागतिक कंपनीची ॲॅमेझॉन डाटा सर्व्हिसेस ही उपकंपनी आहे.

१.७४ लाख चौरस फुट जागा दरमहा २.५९ कोटी रुपये भाड्याने घेतली जाणार आहे. प्रति एकर ६५ लाख रुपये भाडे आहे. म्हणजे प्रति चौरस फूट १४९ रुपये भाडे आहे.

या कराराची नोंदणी ३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. सुरक्षा ठेव म्हणून २.४० लाख रुपये घेण्यात आले. हा करार ऑगस्ट २०४३ पर्यंत आहे. या भूखंडाचा ताबा लार्सन ॲॅण्ड टुब्रोकडून एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत कंपनीला दिला जाईल.

या चार एकर जागेसाठी ॲॅमेझॉन डेटा सर्व्हिसेसने १८ कोटी रुपये प्रति एकर पैसे मोजले आहेत. याचाच अर्थ चार एकरसाठी कंपनी ७२ कोटी मोजेल.

गेल्यावर्षी दोन कंपन्यांनी पवईतील ५.५ एकर जमिनीच्या भाडे तत्वावर देण्याचा करार केला. १८ वर्षांसाठी ॲॅमेझॉन ९२१ कोटी रुपये भाडे देणार आहे. या भाड्यात दरवर्षी ३ टक्के वाढ केली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in