मुंबई-भुवनेश्वरदरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या; मध्य रेल्वेचा निर्णय: गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेमार्फत विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत.
मुंबई-भुवनेश्वरदरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या; मध्य रेल्वेचा निर्णय: गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेमार्फत विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. मुंबई आणि भुवनेश्वर दरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा झाल्यानंतर अनेक नागरिक गावी जाण्याचा बेत आखतात. त्यामुळे रेल्वेमार्फत उन्हाळ्यात अधिक गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात येते. यानंतरही प्रवाशांची विशेष गाड्या चालविण्याची मागणी होत असल्याने अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून अधिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर साप्ताहिक विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत.

०८४१९ साप्ताहिक विशेष शुक्रवारी १० आणि १७ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दुपारी १ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ४५ वाजता भुवनेश्वर येथे पोहोचेल. तसेच ०८४२० साप्ताहिक विशेष बुधवार ८ मे आणि १५ मे रोजी भुवनेश्वर येथून रात्री ११ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

या स्थानकांवर विशेष गाड्यांना थांबे

ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, सेरम, तांडूर, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, पगिडिपल्ली, गुंटूर, विजयवाडा जंक्शन, एलूरू, टाडेपल्लीगुडेम, निडदवोलू, राजमंडी, सामलकोट, पिठापुरम, तुनी, अंनकापल्ली, दुव्वाडा, सिंम्हाचलम, पेन्दुर्ति, कोत्तवलासा विझियानगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा, सोमपेटा, इच्छापुरम, ब्रह्मपुर, छत्रपुर, बालुगांव आणि खोरधा रोड.

डब्यांची संरचना

दोन वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन. (२१ डब्बे)

logo
marathi.freepressjournal.in