कपड्याच्या कंपनीची 4 कोटींची फसवणूक ; व्यावसायिक पती-पत्नीविरुद्ध वनराई पोलिसात गुन्हा दाखल

लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे.
कपड्याच्या कंपनीची 4 कोटींची फसवणूक ; व्यावसायिक पती-पत्नीविरुद्ध वनराई पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई : गोरेगाव परिसरातील एका तयार कपड्याच्या कंपनीकडून घेतलेल्या कपड्याचे पेमेंट न करता सुमारे चार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यावसायिक पती-पत्नीविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विवेक सिंग आणि लता विवेक सिंग अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही कर्नाटकच्या बंगळूरू शहरातील रहिवाशी आहेत. लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

गोरेगाव येथे स्पायकर लाइफ स्टाईल नावाची एक कंपनी असून, या कंपनीने देशभरात अनेक वितरकाची नेमणूक केली आहे. अठरा वर्षांपूर्वी कंपनीने विवेक सिंग याची कंपनीच्या सीएनएफ एजंट आणि फ्रॅन्चायसी म्हणून नेमणूक केली होती. विवेक हा मूळचा कर्नाटकच्या बंगळूरू, यशंवतपुरा रेल्वे स्थानकाजवळील तुकर रोडचा रहिवाशी आहे. त्याच्याकडे कंपनीच्या कपड्याचे वितरण करण्याची जबाबदारी होती.

४ सप्टेंबर २००६ ते २९ एप्रिल २०१५ या कालावधीत कंपनीने विवेकच्या टाईम कंपनीला तीन कोटी तीन लाख, विवेक-लता भागीदार असलेल्या कल्चर क्थोथिंग कंपनीला ७५ लाख ८३ हजार तर लताच्या शिबानी फॅशन कंपनीला १ कोटी ७७ लाख रुपये अशा प्रकारे ५ कोटी ५६ लाख ६४२हजार रुपयांचे कपड्याची डिलीव्हरी केली होती. त्यापैकी या तिन्ही कंपनीचे कमिशनची रक्कम १ कोटी ४१ लाख रुपये होते; मात्र उर्वरित ४ कोटी ९ लाखांचे पेमेंट न करता या दोघांनी संदीप जैन यांच्या स्पायकर लाईफ स्टाईल कंपनीची फसवणूक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in