नायर रुग्णालयात ४ नवीन इमारतींची निर्मिती केली जाणार;पालिका करणार ३५० कोटी खर्च

कोरोनानंतर आरोग्य सेवेकडे सुधारणा करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.
नायर रुग्णालयात ४ नवीन इमारतींची निर्मिती केली जाणार;पालिका करणार ३५० कोटी खर्च

कोविड नंतर रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा पुरविण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार आता पालिकेकडून रुग्णालये वाढीसाठी तसेच रुग्णालयातील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार मुंबई सेंट्रल येथील बी वाय एल नायर रुग्णालयात ४ नवीन इमारतींची निर्मिती केली जाणार आहे. या चार इमारतींमध्ये डॉक्टरांसाठी निवासस्थान, कर्करोग उपचार, सुविधा इमारत, आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा सुविधांवर भर देण्यात येणार आहे.

कोरोनानंतर आरोग्य सेवेकडे सुधारणा करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. रुग्णालयाची रचना, तेथे येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन पालिकेच्या वास्तुशास्त्र विभागाने नवीन इमारतींच्या बांधकामासाठी विशेष योजना तयार केली आहे. त्याचप्रमाणे निवासी डॉक्टरांची निकड लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहे.

तळमजला अधिक २० माळ्यांची इमारत बांधण्यात येणार असून ३८ वन-बीएचके फ्लॅट, तर वसतिगृहात ७८ फ्लॅट असणार आहेत. याशिवाय इतर सेवांसाठी १० मजल्यांची इमारत बांधण्यात येणार असून ही इमारत रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच बांधण्यात येणार आहे. तर अत्याधुनिक शवागाराची निर्मितीदेखील केली जाणार आहे. नायर रुग्णालयात कर्करोगावर उपचार देखील सुरू होणार आहेत. त्यासाठी ओंकॉलॉजी सेवा इमारत बांधण्यात येणार आहे. कर्करोगी रुग्णांना किमो आणि रेडिएशन दिले जाते. याचा त्रास इतर रुग्णांना होऊ नये यासाठी ओंकॉलॉजी सेवा इमारत ही बंकर पद्धतीने बांधण्यात येणार आहे. यासाठी दीड मीटर जाडीचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी ऑटोमिक एनर्जी विभागाची आवश्यक परवानगी ही मिळवण्यात आली आहे. यासाठी १० मजली इमारत उभारण्यात येणार असून बांधकाम सुटसुटीत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in