मुंबईतील हॉटेलमध्ये ४० वर्षीय मॉडेलची आत्महत्या; मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला

या मॉडेलने बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये चेक-इन केले. त्यानंतर जेवणाची ऑर्डरही दिली. यानंतर
मुंबईतील हॉटेलमध्ये ४० वर्षीय मॉडेलची आत्महत्या; मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला

मुंबईतील अंधेरी परिसरात एका ४० वर्षीय मॉडेलने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मॉडेलचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून, घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेलने बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये चेक-इन केले. त्यानंतर जेवणाची ऑर्डरही दिली. यानंतर जेव्हा हॉटेलचा कर्मचारी जेवण घेऊन मॉडेलच्या खोलीत पोहोचला तेव्हा दरवाजा बंद होता. कर्मचाऱ्याने वारंवार विनंती करूनही दरवाजा उघडला गेला नाही आणि आतून कोणाताही प्रतिसाद आला नाही. अखेर त्या कर्मचाऱ्याने याबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकास माहिती दिली. प्रकरण संशयास्पद असल्याचे पाहून हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना याबाबत कळवले, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या उपस्थितीत मास्टर की ने दरवाजा उघडण्यात आला. यानंतर पोलिसांनी जेव्हा खोलीत प्रवेश केला तेव्हा संबंधित मॉडेलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शिवाय, खोलीत एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडली. ज्यामध्ये लिहिले होते की, “मला माफ करा, यासाठी कोणीही जबाबदार नाही. मी आनंदी नाही आणि आता मला शांती हवी आहे.”

यानंतर पोलिसांनी हे प्रकरण संशयास्पद मानून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in