४०१ कोटींची झोमॅटो, स्वीगीला जीएसटी नोटीस

अन्न वितरण करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या ऑर्डर वितरण केल्यानंतर पैसे पुरवले जातात.
४०१ कोटींची झोमॅटो, स्वीगीला जीएसटी नोटीस

धर्मेश ठक्कर/मुंबई : देशात लोकप्रिय असलेल्या खाद्यपदार्थ वितरीत करणाऱ्या झोमॅटो, स्वीगीला जीएसटी विभागाने मोठा दणका दिला. या कंपन्यांना ४०१ कोटी रुपयांची जीएसटी भरण्याची नोटीस दिली आहे.

झोमॅटोला ४०१.७ कोटींचा जीएसटी भरण्याची नोटीस आली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने झोमॅटो व स्विगीला डिलिव्हरी शुल्कावर जीएसटी न भरल्यामुळे ही कर मागणी केली आहे. अन्न वितरण शुल्क हे सेवा श्रेणीत येते. त्यामुळे कंपन्यांना १८ टक्के जीएसटी भरावा लागतो.

जीएसटी अधिकाऱ्यांनी झोमॅटोला ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२२ दरम्यानचा दंड व त्यावरील व्याज भरण्यास सांगितले आहे. कर भरणा करण्यास नकार

झोमॅटोने ४०१ कोटींच्या नोटिसीबाबत कर भरण्यास नकार दिला आहे. आम्ही कर देणे लागत नाही. वितरण शुल्क हे वितरण भागीदारांच्या वतीने कंपनी गोळा करते. कंपनीच्या कंत्राटातील अटी व शर्तीनुसार, वितरण पुरवठाधारक ग्राहकांना सेवा पुरवतात. ते कंपनी नाहीत.

१ जानेवारी २०२२ पासून अन्न पुरवठादार कंपन्यांना रेस्टॉरंटच्या वतीने जीएसटी वसूल करण्याचे व भरण्याचे सक्तीचे केले आहे. वितरण शुल्काबाबत अजूनही स्पष्टता नाही, असे झोमॅटोने सांगितले. अन्न वितरण करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या ऑर्डर वितरण केल्यानंतर पैसे पुरवले जातात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in