फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या आमिषाने ४.५ लाखांची फसवणूक

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सायबर ठगाने सुमारे साडेचार लाखांची फसवणूक
फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या आमिषाने ४.५ लाखांची फसवणूक

मुंबई : फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सायबर ठगाने सुमारे साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार सांताक्रुझ परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सांताक्रुझ पोलिसांनी या सायबर ठगाचा शोध सुरू केला आहे. ३५ वर्षांचे तक्रारदाराला सुधीर नावाच्या एका व्यक्तीने फोन करून ट्रेडिंगसंदर्भात विचारणा केली होती. चॉईस कंपनीचे डिमॅट अकाऊंट ओपन केल्यास चांगला परतावा मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्या सांगण्यावरून फॉरेक्स मार्केटमध्ये साडेचार लाखांची गुंतवणूक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in