वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर कुत्र्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीला अटक

आरोपीविरुद्ध IPC कलम ३७७(अनैसर्गिक लैंगिक कायदा) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११(१)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर कुत्र्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीला अटक

वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर कुत्र्याचं लैगिक शोषण केल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी एका ४५ वर्षीय वक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीला पसुखाद्य आणि बचावकर्ते सीमा रावल यांनी रंगेहात पकडलं आहे. डग्लस एम गोम्स असं या आरोपीचं नाव असून तो वर्सोवा येथील रहिवासी आहे. त्याला वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर एका कुत्र्याचं लैंगिक शोषण करताना पकडल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यानंतर डग्लस याच्यावर प्राणी क्रूरता आणि अनैसर्गिक संभोगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार समुद्र किनाऱ्यावरील एका चौकीदाराने त्यांना आरोपीची कुत्र्याचं लैंगिक शोषण करतानाची क्लिप दाखवली. या क्लिपमध्ये डग्लस एका समुद्र किनाऱ्यावर एका कुत्र्याचं लैगिक शोषण करताना दिसला. यानंतर रावल यांनी त्या चौकीदाराला आरोपी पुन्हा दिसला तर माहिती देण्यास सांगितली.

यानंतर रावल यांना १ ऑगस्ट रोजी आरोपी पुन्हा समुद्र किनाऱ्यावर दिसल्याची माहिती मिळाली. यावेळी किनाऱ्यावर पोहचल्यावर रावल यांनी आरोपीला कुत्र्याचं लैंगिक शोषण करताना पाहून धक्का बसला. ते हादरले. ते संपुर्ण कृत्य त्यांनी त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केले आणि १०३ नंबरवर कॉल केला. यानंतर काही वेळातच वर्सोवा पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांना आरोपी गोम्सला अटक केली. यानंतर पोलिसांकडून गोम्सविरुद्ध IPC कलम ३७७(अनैसर्गिक लैंगिक कायदा) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११(१)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोम्सला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in