विदेशी गुंतवणूक संस्थांची ४९,२५० कोटींची गुंतवणूक

जुलैपासून ते परतल्याने बाजारातही पुनरागमन होऊन सेन्सेक्स पुन्हा ६० हजारांच्या जवळ आला आहे
विदेशी गुंतवणूक संस्थांची ४९,२५० कोटींची गुंतवणूक

गेल्या महिन्यात पुन्हा गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर ऑगस्टमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफपीआय) ऑगस्टमध्ये आतापर्यंत शेअर बाजारात ४९,२५० कोटींची खरेदी केली आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूक संस्थांनी त्यांचा २० महिन्यांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये ६२,०१६ कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सातत्याने पैसे काढणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षी जुलैमध्ये ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पुनरागमन केले. विश्लेषकांचे म्हणणे आहे की ऑक्टोबरपासून बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण एफपीआयने गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला होता. जुलैपासून ते परतल्याने बाजारातही पुनरागमन होऊन सेन्सेक्स पुन्हा ६० हजारांच्या जवळ आला आहे. ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत विदेशी संस्थांनी २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री भारतीय शेअर बाजारातून केली होती.

सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात १.५४ लाख कोटींची घट

आघाडीच्या दहापैकी सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात गेल्या आठवड्यात १,५४,४७७.३८ कोटींची घट झाली आहे. टीसीएस आणि इन्फोसिस यांच्या समभागात मोठी घट झाली आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ८१२.२८ अंक किंवा १.३६ टक्के घसरण झाली. दहापैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या तीन कंपन्यांच्या बाजारमूल्यात वाढ झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in