फ्लॅटच्या आमिषाने पाच कोटींचा अपहार

फ्लॅट देण्याऐवजी त्यांना बंदुकीने गोळी घालण्याची धमकी देण्यात आली
फ्लॅटच्या आमिषाने पाच कोटींचा अपहार

मुंबई : फ्लॅटच्या आमिषाने सुमारे पाच कोटीचा अपहार करून पाच जणांची फसवणुक केल्याप्रकरणी तीन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. जयेश विनोदकुमार तन्ना, विवेक जयेश तन्ना आणि दीप विनोदकुमार तन्ना अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असून त्यात आता आणखीन एका गुन्ह्यांची भर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. विजय अंबुजी जाधव यांनी अंधेरीतील डी. एन नगर परिसरात एक नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी जयेशसह त्याचा भाऊ दिपक आणि मुलगा विवेक यांना ४० लाखांचे पेमेंट केले होते. मात्र फ्लॅट देण्याऐवजी त्यांना बंदुकीने गोळी घालण्याची धमकी देण्यात आली. अशाचप्रकारे या तिघांनी अन्य चार जणांची फसवणूक केली होती. या सर्वांनी डी. एन नगर पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयेश, विवेक आणि दीप यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in