मुंबई: ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ४ व ५ वर सीएसएमटीच्या दिशेला पाच मीटर पादचारी पुलावर गर्डर लॉच करण्यासाठी शनिवारी रात्री १२.५० ते रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत ठाणे स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणारी लोकल सकाळी ५.५६ वाजता सुटेल. तर काही मेल एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान, उल्हासनगर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम स्थलांतरित करण्यात येणार आहे. हायड्रा मशीनद्वारे उभारणीसाठी कल्याण-अंबरनाथ दरम्यान डाउन आणि अप दक्षिण-पूर्व मार्गांवर शनिवारी रात्री एक तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.
कल्याण-अंबरनाथ स्थानकादरम्यान रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्ये उल्हासनगर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम स्थलांतरित करण्यासाठी आणि हायड्रा मशीनद्वारे उभारणीचे काम होणार आहे. शनिवारी रात्री १.१० ते रविवारी रात्री २.१० वाजेपर्यंत काम होणार आहे. या एक तासाच्या कालावधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११. ५१ वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची लोकल आणि अंबरनाथ येथून १०.०१ व १०.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी १२.०४ वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची लोकल कुर्ला येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
ब्लॉकचा विभाग
कल्याण ते अंबरनाथ डाउन दक्षिण-पूर्व लाईन आणि अंबरनाथ ते कल्याण अप दक्षिण-पूर्व मार्ग (कल्याण आणि अंबरनाथ दोन्ही स्थानके वगळून) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.२५ वाजता सुटणारी कर्जत साठीची लोकल कल्याण स्थानकावर १.५१ ते २.१० या वेळेत नियमित केली जाईल.